माणूस नेहेमी प्रेमात किंवा भीती मध्ये जगतो .
आपण एखाद्या माणसावर प्रेम तर करतो पण पुन्हा दुसर्याच क्षणी त्याला गमवायची भीती मनात बाळगतो . तसेच आयुष्यात मोठ तर व्हायचं असत पण नंतर आपल्याला जमेल न सगळ याची भीती मनात धरून संसारच गाड पुढे धकलतो.
या प्रेम आणि भीतीच्या नादात कित्येक गोष्टी डोक्यातून निसटून जातात.
पण ते आपल्या हातून सांडून गेल्यानंतर लक्षात येत.
मग कधी माणूस शांततेत , प्रेमात आणि आनंदात जगणार ?
की फक्त सुंदर देखावे रंगवणार आणि मनाची समजूत घालणार.
खरं तरं या सगळ्याचं उत्तर एकच असाव "अपेक्षा ".
अपेक्षा किती , कश्या ,कोणाकडून आणि ठेवायच्या कि नाही ?
या सगळ्याचं उत्तर मिळाल की कदाचित तू प्रेमाने बोलशील , खळखळून हसशील आणि आनंदात जगशील.
जरा भीतीचं पांघरून बाजूला सारून प्रेमाच्या मऊ गोधडीत शिरून बघ …