एका स्वप्नांत होते छान
मस्त , मोकळा श्वास
मंद सुवास आणि शांत मन
सोबत तुझी साथ ।।
पटकन आली जाग
क्षणात आला घाम
घाबरले क्षणात
पण तू होतास खास ।।
जागा झालास तू पण
उजेड आला झटकन
स्वप्नातले पळून गेले भास
त्यात तू म्हणालास आता मात्र हास ।।
आता होती पुन्हा शांतता
तोच मस्त मोकळा वारा
बेधुंद विरघळलो एकमेकांत
झोपून गेलो नवीन स्वप्नांत ।।।