Thursday, August 15, 2013

असशील हे खरं !

कळलंच नव्हतं तू काय आहेसं ?
झेपलचं  नव्हतं तू कोण आहेसं ?
पण तू होतास हे आणि आहेसं हे खरं .

जाणीव होती पण विश्वास नव्हता ,
मैत्री होती पण विचार  नव्हता ,
आधार होता पण हात  नव्हता ,
प्रेम होत पण गोडवा  नव्हता ,
साथ होती पण हट्ट नव्हता ,
एकांत होता पण एकटेपणा नव्हता .

आता कळलं तू काय आहेस?कोण आहेसं ?
पहिला पाऊस , नवी दिशा ,
नवी पालवी , नवा चेहेरा ,
नवे स्वप्न , नवे रंग ,
शांत आभाळ , खळखळणारा झरा ,
उडणारा पक्षी , मोकळा श्वास ……

पण तू होतास हे  आहेसं हे आणि  असशील हे खरं !



Saturday, August 10, 2013

उभे राहता राहता तोल गेला  
चालता चालता रस्ता संपला 
बघता बघता अंधार दाटला 
दुःखाचे सांत्वन करता करता घसा कोरडा पडला … 

असाच बराच वेळ विचार केला 
आपण असं केलं असतं तर काय झालं असतं 
आणि 
तसं केलं असतं तर काय आलं असतं आपल्या वाट्याला 
नव्या जाळ्यात अडकलेल्या बऱ्याच वाटा 
एकही न पकडलेल्या … 

मग मेंदूने ईशारा केला 
खूप विचार करा 
अजून प्रश्न उत्तरांचा भडीमार चालवा 
पुन्हा हे गुंते नव्याने गुंतवा 
आणि 
असं करून कशाचीच उत्तरे न मिळाल्यावर पुन्हा रडा …   

खूप रडून डोळ्यात पडला कोरडा 
डोक्याचा पार झाला भुगा 
काहीच न करू शकल्याच आला स्वतःलाच हेवा 
शेवट मात्र गोड व्हावा अशी मनी इच्छा …  

मग झाला विचार नव्या उमेदीने उभं राहायचा   
ताज्या टवटवीत फुलासारखं उमलायचा 
करकरीत तलवारीसारख लढायचा 
आणि यात शेवट झाला गोड आणि विजय झाला  झोपेचा ।।