Friday, August 28, 2020

सुखांत

पहिल्या भेटीत मी नजर चुकवली, 
तरी तू पुन्हा भेटायची वेळ आणली,
तू बघतोयस हे कळेपर्यंत कोण बघत का?
पण तूझी ती आरपार नजर.. 
नको करून टाकलं ,
पण नंतर तेच हवहवसं वाटलं 
  
पुनः दुसरी भेटही अचानकच 
पण नेहेमीसारखं वाचून गेलास माझं कोरडे ठक मन  
डोळ्यातले खरे भाव 
डोक्यातील गुंता सर्व तुला जुनच 
पण ओळखलेस तू नव्यानं 

धो धो पाऊस पडताना 
मी स्वतःचा जीव सावरत चालताना 
सतत मागून येणार हॉर्नचा आवाज  
शेवटी फिरले मागे आणि साक्षात तू पाठी 
आता पुनः काही महिन्यांनी झालेली भेट 
तीही अचानक. 
आता जरा भीती वाटली की मुद्दाम नियती रचते की काय भन्नाट कट,

क्षणात कैद केलं त्याने मला त्याच्या नजरेत, 
गाडीचा उघडता दरवाजा 
गिळलास तू आवंढा 
बसली बाबा, नाहीतर सांगायची 
काच खाली कर बोलू 2 मिनिटे आणि निघायची 
पण आज असं झालं नाही.  

मला आलेला कंटाळा सगळ्याचा 
कशाला करावा विचार सर्वांचा 
झुगारून सगळे विचार 
उतरवला बोजा संस्कारांचा 

दोघांनी बघितले एकमेकांकडे
नजरेतून मिळाले अनेक संकेत 
तरीही त्याने केली सुरू गाडी 
आणि निघालो त्या काळोख्या रात्री दूर काळोखात 
 
पुढचं पुढे राहीलं,मागचं मागे 
आता होते हातात हात आमचे 
ओंजळीत आठवणींचे ओझे 
पण निसटले हातातूनी हात 
ओसारल्या भावना आणि साथ. 


Wednesday, April 29, 2015

शांतता आणि कोलाहल

आज सगळीकडे शांतता होती . . 
सगळचं काहीस वेगळ वेगळ होत . . 
समजेना नक्की काय चाललंय . . 
एवढ्यात तू आलास . . पटकन घाबरले मी . . 
आतुरता होती पण शाश्वती नव्हती . . 
बरेच दिवस तग लावून बसलेले तुझ्या ओढीची . . 
अखेर तो काळ संपला . . 
भेटलो , भिडलो , सावरलोही . . 
गचकन हेरलस, चटकन तोडलसही. . 
पुन्हा एकदा सावरले मी . . 
विचार करत होते तुझा माझा . . 
आपल्या नात्याचा . . 
आता सगळीकडे गोंधळ होता . . 
मी क्षणात कोमेजून गेले . . 
अगदी पाणी नाहीसे होऊन जमिनीला तडा गेल्यासारखे . . 
चलबिचल वाढत गेली . .
खिन्न होऊन जणू तंद्रीच लागली . . 
भानावर येताच तू गायब . . 
आता वेगळेपण जाणवलं . . 
आणि वेगळेपण गवसलं . .    

Monday, April 21, 2014

स्वप्नांत

एका स्वप्नांत होते छान 
मस्त , मोकळा श्वास 
मंद सुवास आणि शांत मन
सोबत तुझी साथ ।।

पटकन आली जाग
क्षणात आला घाम  
घाबरले क्षणात 
पण तू होतास खास ।।

जागा झालास तू पण 
उजेड आला झटकन 
स्वप्नातले पळून गेले भास 
त्यात तू म्हणालास आता मात्र हास ।।

आता होती पुन्हा शांतता 
तोच मस्त मोकळा वारा 
बेधुंद विरघळलो एकमेकांत
झोपून गेलो नवीन स्वप्नांत ।।।
 
 

Wednesday, April 16, 2014

गुदमरायला होतंय

सगळीकडेच का इतकं गुदमरायला होतंय ?
दार उघडायला इतका का वेळ लागतोय ?
भिंती पण अबोल , शांत , स्वाभिमानी
छताची गोष्ट इतकी का निराळी ?

सगळीकडेच का इतकं गुदमरायला होतंय ?
खिडक्यांना पण वाऱ्याला आत ये सांगायला वेळ हवायं
फटींनी जणू असहकार पुकारलाय
पण जुनी धूळ , जळमटं स्वार्थीपणे का जगतायत ?

सगळीकडेच का इतकं गुदमरायला होतंय ?
दार , खिडकी  यांचा काहीच उपयोग नाही असं वाटतंय
वारा आत येउन घर घाण करेल याची खात्री आहे
पण वाऱ्याच्या शांततेचा कोणी विचारही करत नाहीये …

सगळीकडे का इतकं गुदमरायला होणारे ???

Thursday, August 15, 2013

असशील हे खरं !

कळलंच नव्हतं तू काय आहेसं ?
झेपलचं  नव्हतं तू कोण आहेसं ?
पण तू होतास हे आणि आहेसं हे खरं .

जाणीव होती पण विश्वास नव्हता ,
मैत्री होती पण विचार  नव्हता ,
आधार होता पण हात  नव्हता ,
प्रेम होत पण गोडवा  नव्हता ,
साथ होती पण हट्ट नव्हता ,
एकांत होता पण एकटेपणा नव्हता .

आता कळलं तू काय आहेस?कोण आहेसं ?
पहिला पाऊस , नवी दिशा ,
नवी पालवी , नवा चेहेरा ,
नवे स्वप्न , नवे रंग ,
शांत आभाळ , खळखळणारा झरा ,
उडणारा पक्षी , मोकळा श्वास ……

पण तू होतास हे  आहेसं हे आणि  असशील हे खरं !



Saturday, August 10, 2013

उभे राहता राहता तोल गेला  
चालता चालता रस्ता संपला 
बघता बघता अंधार दाटला 
दुःखाचे सांत्वन करता करता घसा कोरडा पडला … 

असाच बराच वेळ विचार केला 
आपण असं केलं असतं तर काय झालं असतं 
आणि 
तसं केलं असतं तर काय आलं असतं आपल्या वाट्याला 
नव्या जाळ्यात अडकलेल्या बऱ्याच वाटा 
एकही न पकडलेल्या … 

मग मेंदूने ईशारा केला 
खूप विचार करा 
अजून प्रश्न उत्तरांचा भडीमार चालवा 
पुन्हा हे गुंते नव्याने गुंतवा 
आणि 
असं करून कशाचीच उत्तरे न मिळाल्यावर पुन्हा रडा …   

खूप रडून डोळ्यात पडला कोरडा 
डोक्याचा पार झाला भुगा 
काहीच न करू शकल्याच आला स्वतःलाच हेवा 
शेवट मात्र गोड व्हावा अशी मनी इच्छा …  

मग झाला विचार नव्या उमेदीने उभं राहायचा   
ताज्या टवटवीत फुलासारखं उमलायचा 
करकरीत तलवारीसारख लढायचा 
आणि यात शेवट झाला गोड आणि विजय झाला  झोपेचा ।। 

Sunday, June 30, 2013

माणूस नेहेमी प्रेमात किंवा भीती मध्ये जगतो .
आपण एखाद्या माणसावर प्रेम तर करतो पण पुन्हा दुसर्याच क्षणी त्याला गमवायची भीती मनात बाळगतो . तसेच आयुष्यात मोठ तर व्हायचं असत पण नंतर आपल्याला जमेल न सगळ याची भीती मनात धरून संसारच गाड पुढे धकलतो. 
या प्रेम आणि भीतीच्या नादात कित्येक गोष्टी डोक्यातून निसटून जातात. 
पण ते आपल्या हातून सांडून गेल्यानंतर लक्षात येत. 
मग कधी माणूस शांततेत , प्रेमात आणि आनंदात जगणार ? 
की फक्त सुंदर देखावे रंगवणार आणि मनाची समजूत घालणार. 
खरं तरं या सगळ्याचं  उत्तर एकच असाव "अपेक्षा ". 
अपेक्षा किती , कश्या ,कोणाकडून आणि ठेवायच्या कि नाही ?
या सगळ्याचं उत्तर मिळाल की कदाचित तू प्रेमाने बोलशील , खळखळून हसशील आणि आनंदात जगशील. 
जरा भीतीचं पांघरून बाजूला सारून प्रेमाच्या मऊ गोधडीत शिरून बघ …