Saturday, August 10, 2013

उभे राहता राहता तोल गेला  
चालता चालता रस्ता संपला 
बघता बघता अंधार दाटला 
दुःखाचे सांत्वन करता करता घसा कोरडा पडला … 

असाच बराच वेळ विचार केला 
आपण असं केलं असतं तर काय झालं असतं 
आणि 
तसं केलं असतं तर काय आलं असतं आपल्या वाट्याला 
नव्या जाळ्यात अडकलेल्या बऱ्याच वाटा 
एकही न पकडलेल्या … 

मग मेंदूने ईशारा केला 
खूप विचार करा 
अजून प्रश्न उत्तरांचा भडीमार चालवा 
पुन्हा हे गुंते नव्याने गुंतवा 
आणि 
असं करून कशाचीच उत्तरे न मिळाल्यावर पुन्हा रडा …   

खूप रडून डोळ्यात पडला कोरडा 
डोक्याचा पार झाला भुगा 
काहीच न करू शकल्याच आला स्वतःलाच हेवा 
शेवट मात्र गोड व्हावा अशी मनी इच्छा …  

मग झाला विचार नव्या उमेदीने उभं राहायचा   
ताज्या टवटवीत फुलासारखं उमलायचा 
करकरीत तलवारीसारख लढायचा 
आणि यात शेवट झाला गोड आणि विजय झाला  झोपेचा ।। 

No comments:

Post a Comment