Wednesday, April 17, 2013

नाव,चौकट,बंधन …

नात्यांना नाव पडली की त्यांच्या चौकटी ठरतात,
चौकटी ठरल्या की त्यात राहायच्या  मर्यादा पडतात,
नको ती नाव, नको ती चौकट, नको ते बंधन …

का तो क्षण थांबला नाही ? , पुन्हा आलाच नाही ?
बघायचं होत तुला डोळे तृप्त होईपर्यंत,
भिडायचं होत तुला मन भरेपर्यंत.

ही नाती, त्यांना ठेवलेली नाव, ती चौकट,
झुगारून टाकल सगळं ,
आता कळून चुकलं नसतं काही यात वावगं.

पण तो क्षण ती भेट ,पुन्हा कशी रे येईल ?
कधी भेटशील का तू मला ?




Saturday, April 13, 2013

तू तोच आहेस, मी तू आहे :)


तुझ्यात मला शोधण्याची आस,
माझ्यात तुला बघण्याचा तो भास,
भासातून उमगलेला तू आणि भेटीसाठी आतुरलेली मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे . 

बोलण्यातून स्पष्ट दिसणारा,वागण्यातून खोडकर असणारा,
कळलच नाही कधी गुंतावलस तू मला,
गुंतावण्यातून बहरले मी आणि बहरातून खुलवलस तू,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

रंग चढले , प्रेम व्यक्त झाले,
तुझ्या आठवणीत मन झुलू लागले,
उंच भरारी घेतलीस तू आणि उडायला शिकले मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

गप्पा, हसणं - खिदळणं , फिरणं आवडू लागलं आपल्याला, 
हातातले हात घट्ट पकडणं  मान्य होत एकमेकांना,
माझ्यासाठी असलेला तू आणि तुझ्यासाठी असलेली मी,
तू तोच आहेस, मी तू आहे :)




Wednesday, April 10, 2013


घट्ट मिठी ती समुद्राकाठची ,
ती ओली माती आपुल्या वाटची ,
त्या रिमझिमणाऱ्या पाऊस धारा, 
तो शहारणारा वारा ,
आठवून जाई क्षणात मजला ,
तो क्षण डोळ्यात माझ्या सजला ,
ती प्रीत होती का एका रातची ?
घट्ट मिठी ती समुद्राकाठची !!!