Saturday, April 13, 2013

तू तोच आहेस, मी तू आहे :)


तुझ्यात मला शोधण्याची आस,
माझ्यात तुला बघण्याचा तो भास,
भासातून उमगलेला तू आणि भेटीसाठी आतुरलेली मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे . 

बोलण्यातून स्पष्ट दिसणारा,वागण्यातून खोडकर असणारा,
कळलच नाही कधी गुंतावलस तू मला,
गुंतावण्यातून बहरले मी आणि बहरातून खुलवलस तू,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

रंग चढले , प्रेम व्यक्त झाले,
तुझ्या आठवणीत मन झुलू लागले,
उंच भरारी घेतलीस तू आणि उडायला शिकले मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

गप्पा, हसणं - खिदळणं , फिरणं आवडू लागलं आपल्याला, 
हातातले हात घट्ट पकडणं  मान्य होत एकमेकांना,
माझ्यासाठी असलेला तू आणि तुझ्यासाठी असलेली मी,
तू तोच आहेस, मी तू आहे :)




2 comments:

  1. वा. चांगलं लिहिलंयस. व्यक्त होता आलं पाहिजे. आणि खरं खरं व्यक्त व्हायचं. मनापासून लिहिलं की ते आवडतं आपल्याला आणि लोकांनाही.
    लगे रहो..

    ReplyDelete
  2. kahi goshti vyakt n kalelyahi changlya astat. so nehemich nako vyakt vhayla.he he :) thanku so much btw.

    ReplyDelete