तुझ्यात मला शोधण्याची आस,
माझ्यात तुला बघण्याचा तो भास,
भासातून उमगलेला तू आणि भेटीसाठी आतुरलेली मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे .
बोलण्यातून स्पष्ट दिसणारा,वागण्यातून खोडकर असणारा,
कळलच नाही कधी गुंतावलस तू मला,
गुंतावण्यातून बहरले मी आणि बहरातून खुलवलस तू,
तू तोच आहेस,मी तीच आहे .
रंग चढले , प्रेम व्यक्त झाले,
तुझ्या आठवणीत मन झुलू लागले,
उंच भरारी घेतलीस तू आणि उडायला शिकले मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे .
वा. चांगलं लिहिलंयस. व्यक्त होता आलं पाहिजे. आणि खरं खरं व्यक्त व्हायचं. मनापासून लिहिलं की ते आवडतं आपल्याला आणि लोकांनाही.
ReplyDeleteलगे रहो..
kahi goshti vyakt n kalelyahi changlya astat. so nehemich nako vyakt vhayla.he he :) thanku so much btw.
ReplyDelete